Home » News लाडकी बहिण योजना लाभार्थी यादी जाहीर Harish Chandra November 30, 2024 0 Ladki bahin aditi tatkare महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला बंपर विजय मिळाला आहे. या विजयात लाडक्या बहिणींचा मोठा वाटा आहे. त्यामुळे या लाडक्या बहिणींना रिटर्न गिफ्ट देण्याची सरकारची तयारी सुरु झाली आहे. राज्यभरातील 13 लाख महिलांना हे रिटर्न गिफ्ट मिळणार आहे. या महिलांचे अर्ज बँक खाते आधारशी लिंक नसल्यामुळे प्रलंबित होते. परंतु आता त्यांचे अर्ज मंजूर करण्यात येणार आहे. राज्यातील 2.34 कोटी महिला या योजनेचा लाभ घेत आहे. त्यांना दर महिन्याला 1,500 रुपये सरकारतर्फे दिले जात आहे. ही रक्कम वाढवून 2,100 रुपये करण्याचे आश्वासन महायुतीने निवडणूक जाहीरनाम्यात दिले होते. 1ली लाभार्थी यादीत नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, राज्यातील 2.34 कोटी महिलांना लाडक्या बहीण योजनेचा लाभ मिळत आहे. या योजनेसाठी आलेल्या 13 लाख बहिणींचे अर्ज प्रलंबित होते. ते अर्जही आता निकाली काढण्यात येणार आहे. डिसेंबर महिन्यांपासून त्यांना रक्कम मिळण्यास सुरुवात होणार आहे. 1ली लाभार्थी यादीत नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी राज्य सरकारने यापूर्वी 35,000 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. या तरतुदीत लाडक्या बहिणांना महिन्याला 1,500 रुपये दिले जात आहे. परंतु महिन्याला 2,100 रुपये देण्यासाठी ही तरतूद वाढवावी लागणार आहे. त्यासाठी नवीन सरकारला आता हालचाली कराव्या लागणार आहे. नवीन सरकाच्या स्थापनेनंतर पहिला निर्णय लाडक्या बहिणांना निधी वाढवण्याचा असू शकतो. 1ली लाभार्थी यादीत नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा महायुतीला लोकसभा निवडणुकीत राज्यात अपयश आले होते. त्यानंतर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरु करण्यात आली. त्यामुळेच विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड यश मिळाले. या योजनेचे सर्वाधिक लाभार्थी पुणे जिल्ह्यातून आहे. त्यानंतर नाशिक, ठाणे आणि मुंबईचा क्रमांक आहे. मागील सरकारमध्ये महिला आणि बाल कल्याण विभागाचे मंत्रीपद आदिती तटकरे यांच्याकडे होते. त्यांच्या खात्यामार्फत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राबवली जात होती. आता नवीन सरकारमध्ये त्यांनाच या खात्याचे मंत्रीपद मिळण्याची अपेक्षा आहे. विधानसभा निवडणुकीत त्यांनी अनिल नवगाने यांचा पराभव करत विजय मिळवला आहे. Share this: f Facebook t Twitter ✆ Whatsapp ➣ Telegram