Home » News “नाच रे मोरा आंब्याच्या वनात” मित्राच्या लग्नात तरुणानं केला खतरनाक डान्स; VIDEO पाहून पोट धरुन हसाल Harish Chandra November 30, 2024 0 Wedding dance आयुष्यात मित्र खूप महत्त्वाचे असतात, असं म्हटलं जातं. एकीकडे ते आपल्या प्रत्येक सुख-दुःखात आपल्या सोबत असतात तर दुसरीकडे मस्ती करण्यातही तितकेच पुढे असतात. काही अगदी बॉडीगार्डप्रमाणे सतत आपल्या आजूबाजूला असतात तर काही लोकांमध्येही आपली मस्करी करण्याची संधी सोडत नाहीत. लग्नात तर मित्र अगदी विचित्र मस्करी करताना दिसतात. अनेकदा मित्रांचे कारनामे सोशल मीडियावर व्हायरल होतात, असाच एक लग्नातील नवरदेवाच्या मित्राचा डान्स सध्या तुफान व्हायरल होतोय. हा व्हिडीओ पाहून तु्म्हीही पोट धरुन हसाल एवढं नक्की. व्हायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा View this post on Instagram A post shared by Surya Chatur🧿 (@surya.chatur.official) सोशल मीडियावर सध्या लग्न समारंभातील व्हिडीओचा धुमाकूळ पाहायला मिळतोय. कधी नवरा-नवरीचे व्हिडिओ तर कधी लग्नात सहभागी मित्रमंडळींचा धकामेदार डान्स परफॉर्मन्सचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. लग्न समारंभातील असे व्हिडीओ तुम्ही हसून हसून लोटपोट होत असाल. लग्नात सहभागी झालेल्या मित्राच्या डान्सचा असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. आपल्या एखाद्या मित्राचं लग्न असेल तर त्याच्या मित्रांची एक्साईटमेंड एकदम हाय लेव्हलवर असते. लग्नाची तारीख निश्चित होताच सर्व मित्र तयारी सुरु करतात. कपड्यांपासून डान्स परफॉरमन्सपर्यंत सगळं निश्चित केलं जातं. सर्व मित्र एकत्र लग्नात पोहोचतात. तिथं ते आपल्या मित्रासाठी खास डान्स सादर करतात. व्हायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा अशाच एका लग्नात एका तरुणानं चक्क नाचरे मोरा आंब्याच्या वनात या गाण्यावर तुफान डान्स केलाय. अक्षरश: त्याच्या अंगात मोरच आलाय की काय असं थोड्यावेळासाठी प्रत्येकालाच वाटलं. तर दुसरीकडे त्याच्या स्टेप्स पाहून तुम्हीही लोटपोट व्हाल एवढं नक्की. या व्हिडीओमध्ये पाहू शकता हा तरुण मोरासारखा पिसारा फुलवून नाचल्यासारखा स्वत: नाचत आहे. यावेळी नवरदेवही या तरुणासोबत नाचताना दिसतोय तर इतर मित्र त्याची मजा घेत आहेत. लग्नातील या तरुणाचा डान्स पाहून नेटकऱ्यांनी अधिक मजा घेतली आहे. लोकं हा व्हिडीओ अधिक व्हायरल करीत आहेत. Share this: f Facebook t Twitter ✆ Whatsapp ➣ Telegram